भूगोल अभ्यास व संशोधन मंडळा अंतर्गत विद्यार्थ्यांनी जाणली टिप्पागडची माहिती

336

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०२ : येथील श्री जी सी पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर भूगोल विभागातील भूगोल अभ्यास व संशोधन मंडळा द्वारा क्षेत्रीय अध्ययनाचे आयोजन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या अभ्यासक्रमाचा एक भाग व अभ्यास पूरक क्रियाशील उपक्रम म्हणून कोरची तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण टिपागड येथे आयोजित करण्यात आले. सदर उपक्रम भूगोल अभ्यासक सहभागी झाले याप्रसंगी टिप्पागडची पार्श्वभूमी व तलाव निर्मितीचा इतिहास भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. हरीश लांजेवार यांनी सांगितला. विशेष म्हणजे येथे निर्माण झालेला तलाव प्राचीन काळी ज्वालामुखी क्रियेने निर्माण झाला असून त्या तलावाचा समावेश क्रेटर सरोवरात होतो तसेच या ठिकाणी बहिर्गत घटकांचे कार्य कसे घडून येत आहेत, भूकवचात व भू रूपात बदल कसा होत आहे याबद्दल विद्यार्थ्यांनी जिज्ञाशू प्रवृत्तीने भौगोलिक क्रिया कलापांचा कार्यकारण संबंध अभ्यासला.
सदर उपक्रमात प्राध्यापक गुरुदेव सोनुले व प्राध्यापक भाविकदास करमणकर यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी तेथे निर्माण झालेले खडक व खडकाचे प्रकार, विदारण क्रिया प्रस्तरभंग इत्यादी बाबत प्रश्न रूपाने आपल्या शंका व्यक्त करत भौगोलिक घडामोडीचे अध्ययन केले. तसेच व्यावहारिक भूरूपशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे त्या ठिकाणी उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून किल्ल्याचा परकोट म्हणजे दगडी संरक्षण भिंत बांधली त्याठिकाणी जलाशय निर्माण झाले आहे ही सुद्धा एक ऐतिहासिक घटना आहे. टिपागड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे तसेच भविष्यकालीन संभाव्य उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून टिप्पगडचे आहे. टिप्पागड येथे माघ पौर्णिमेला तीन दिवशीय जत्रा आयोजित करण्यात येते. तलावाच्या काठावर मत्कुरी मातेचे मंदिर मडावी परिवाराने बांधले आहे. तलावाच्या पश्चिम भागात टिप्पागडी नदीच्या उगम स्थानाजवळ कड्यावर हनुमानाची तेथून नैऋत्य जवळपास दोनशे फूट उंचीवर आदिवासी चे गुरुबाबा देवस्थान हे एका नैसर्गिक गुहेत आहेत. तेथून पुढे जवळपास शंभर ते एकसे पन्नास फूट उंचीवर गेले असता जणू काही मध्यप्रदेश मधील चैरागड चा अनुभव येतो म्हूणन याठिकाणी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने येतात. शासनाने व लोकप्रतिनिधी यांनी यात विशेष लक्ष घालून विकासाच्या दृष्टिकोनातून तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या भागाचा विकास घडून आणल्यास येथील स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here