– ग्राहक हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याची निवड
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : ग्राहक हक्कांच्या चळवळीत सातत्याने सक्रिय राहून जिल्हा व राज्यस्तरावर भक्कम भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या दखलीनंतर हा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. गडचिरोलीत प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी प्रांत संघटन मंत्री अभय खेडकर, प्रांत सचिव चारुदत्त चौधरी, संतोष डोमाळे, जितेंद्र बंगले, प्रांत सदस्य चंद्रकांत पतरंगे, मार्गदर्शक प्रकाश पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.उदय धकाते यांनी जिल्हा सचिव म्हणून कार्य करताना ग्राहकांच्या समस्यांवर ठामपणे आवाज उठवला. त्यांच्या नेतृत्वामुळे गडचिरोली ग्राहक पंचायतची राज्य व राष्ट्रीय स्तरावर ठळक ओळख निर्माण झाली. त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. यावेळी प्रांताध्यक्ष डॉ. मेहरे यांनी नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणीत अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष विजय साळवे व डॉ. महेश जोशी, सचिव अरुण पोगळे, सहसचिव सौ. विद्या श्रीराम जवळे व नरेश कहूरके, कोषाध्यक्ष अनंता माकोडे, महिला आयाम प्रमुख सौ. सुचिता उदय धकाते, मार्गदर्शक प्रकाश पाठक, केंद्र कार्यालय प्रमुख विजय कोतपल्लीवार, प्रचार प्रमुख सौ. जोत्स्ना कापूरकर, विधी आयाम प्रमुख ॲड. नीलकंठ भांडेकर, पर्यावरण प्रमुख डॉ. देवेंद्र मुनघाटे, रोजगार सृजन प्रमुख सौ. भारती स्वरूप तारगे व IT सेल जिल्हा प्रमुख अमित साखरकर यांचा समावेश आहे.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. किशोर वैद्य, सौ. सुनीता विजय साळवे, सौ. शालिनी निंबारते, सौ. आशा आनंदराव कोकोडे, सौ. नीलिमा देशमुख, सौ. मेघा विजय कोतपल्लीवार, मनसुखलाल मेश्राम, बळवंतराव येवले, राजू सत्यनारायणराव गुब्बावार, साक्षी प्रकाश भांडेकर आणि अमित हस्ते यांची निवड करण्यात आली आहे.
“गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही ग्राहकाची व्यापारी किंवा अन्य विभागातून फसवणूक झाल्यास त्यांनी निर्धास्तपणे ग्राहक पंचायतकडे तक्रार नोंदवावी. तक्रारीसाठी 9423422323 या क्रमांकावर संपर्क साधावा. ग्राहकांच्या हक्कांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे उदय धकाते यांनी स्पष्ट केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #ConsumerRights #Gadchiroli #UdayDhakate #CustomerProtection #ConsumerPanchayat #Leadership #SocialWork #MaharashtraNews #CommunityLeadership #ConsumerAwareness
#ग्राहकहक्क #गडचिरोली #उदयधकाते #ग्राहकपंचायत #नेतृत्व #सामाजिककार्य #महाराष्ट्रबातम्या #ग्राहकजागृती #जिल्हाध्यक्ष #ग्राहकसंरक्षण
