– तहसीलदार आर.एम. कुमरे यांचे निर्देश
The गडविश्व
कुरखेडा – गडचिरोली दि. २२ : महाशिवरात्री निमित्त अरततोंडी येथे आयोजित महादेवगड यात्रा तंबाखूमुक्त / दारूमुक्त व्हावी त्याकरिता ग्रामपंचायत समिती, पोलिस विभाग, महादेवगड देवस्थान समिती, मुक्तिपथ चमू व महाविद्यालयातील NSS विद्यार्थी यांनी संयुक्तरीत्या कृती करावी, असे आदेश मुक्तीपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार आर.एम. कुमरे यांनी दिले.
कुरखेडा येथील तहसील कार्यालयात दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका समितीची मासिक बैठक पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीत सचिव तालुका समिति तथा मुक्तिपथ कार्यालय कुरखेडा तालुका संघटक शारदा जे मेश्राम, एम. बी. वाघ पोलिस निरीक्षक, नरहरी एन. बोरकुटे तालुका आरोग्य विभाग, एन.एस.एस प्रमुख डॉ.एस.एन. निवडंगे, निशा. पी चचाणे समुपदेशक राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, चरणदास पी. कवाडकर गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष, अशोक मेश्राम गुरुदेव सेवा मंडळ सचिव, पंकज भा. गावडे मुख्याधिकारी नगर पंचायत कुरखेडा, आर टी. चौधरी तहशील कार्यालय, के. के. कुलसंगे पंचायत समिती, रवींद्र श. गोरे सार्वजनिक बांधकाम विभाग, पी. एम. नाकाडे जि.प बांधकाम उपविभाग, प्रा. सूरज बी. शेंडे डी. के. महाविद्यालय, विजयजी तुलावी सरपंच खरमतटोला, मीनाक्षी शेडमाके पोलीस पाटील अरततोंडी, जीवन एम दहिकर प्रेरक मुक्तिपथ तालुका कार्यालय, महेश के खोब्रागडे स्पार्क कार्यकर्ता, सीमा भेले वॉर्ड संघटन अध्यक्ष, विजयलक्ष्मी वघारे प्रतीनिधी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था, उत्तरा दखणे प्रतीनिधी ग्राम आरोग्य संस्था आदी उपस्थित होते.
वनविभाग जंगल परिसरातील अवैध मोह सडवा नष्ट करून वनविभागाद्वारे कार्यवाही करण्याचे आदेश दिले. शाळा तंबाखू मुक्त असाव्या. बी.डी. ओ यांनी शाळांना पत्र पाठवून नोडल अफिसर, मुख्याध्यापक यांना कृती करण्यास सांगावे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्य किवा विविध उपक्रमाद्वारे शहरात व गावात दारू व तंबाखू विक्रीवर होणाऱ्या आजारावर जनजागृती करणे. तालुक्यातील ज्या गावात मोठ्या प्रमानात दारू विक्री सुरू आहे. त्या गावात ग्रामपंचायत समिती, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ति अध्यक्ष व समिती, पोलिस विभाग, मुक्तिपथ चमू याद्वारे बंद करणे असे आदेश दिले. शासकीय / निमशासकीय कार्यालय तंबाखू मुक्त करण्याबाबत नगर पंचायत कर्मचारी, तहशील कर्मचारी, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, NTCP व मुक्तिपथ यांचे पथक स्थापन करून महिन्यातून दोनदा शासकीय कार्यालयात व शहरात अचानक भेट देऊन विक्री करणारे व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणारे यांच्यावर कोटपा व साथरोग कायद्यांतर्गत दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायत समितीद्वारे गावात ग्रामसभा घेऊन मुक्तिपथ व पोलिस विभाग यांच्या द्वारे गावातील दारू विक्री बंद करणे असे आदेश दिले. गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सहकार्याने गावा-गावात तंबाखू जन्य पदार्थ व दारू मुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे. ग्राम पंचायत समिती बैठक व कृती व्हावी. अवैध्य दारू विक्रेत्याला नोटिस देणे, दंड आकारणे, पोलिस कार्यवाही करणे, योजना पासून वंचित ठेवण्याचा धाक देणे इत्यादी कृती करणे, आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
