– भाजपा धानोरा तर्फे पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक उपक्रम
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २३ : भारतमातेचे सच्चे सुपुत्र, राष्ट्रवादी विचारवंत व बलिदानी नेता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी धानोरा तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या राष्ट्रहितासाठीच्या योगदानाची आठवण करून देत, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण कार्यक्रम देखील घेण्यात आला.
या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. मुखर्जी यांच्या विचारांना उजाळा देत, त्यांचे देशासाठीचे बलिदान आणि ध्येयवाद जनतेसमोर मांडला. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी झाडे लावून हरित श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाला भाजप धानोरा तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
