The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याला सलाम करत व शहीद जवानांच्या बलिदानाची आठवण जागवण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इंदिरा गांधी चौक ते कारगिल चौक दरम्यान भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीद्वारे जनमानसात देशभक्ती, ऐक्य आणि शूर जवानांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञतेची भावना जागवण्याचा सशक्त प्रयत्न करण्यात आला.
या प्रेरणादायी रॅलीत खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅली दरम्यान उपस्थित मान्यवरांनी “ही फक्त श्रद्धांजली नव्हे, तर राष्ट्रीय एकतेचा जागर आहे” अशा भावना व्यक्त केल्या.
