झाड कोसळून वाहतूक ठप्प : चंद्रपूर–मूल मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

358

The गडविश्व
चंद्रपूर, दि. ०९ : चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे चंद्रपूर–मूल मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. चिचपल्लीपासून सुमारे ५ किमी अंतरावर लोहार फाटा परिसरात रस्त्यावरच एक भले मोठे झाड कोसळल्याने या प्रमुख मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक अडकल्याची घटना घडली.
सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर घनदाट वनक्षेत्र असल्याने अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. अचानक झाड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला वाट काढत मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला.
झाडाचे आकारमान मोठे असल्याने ते हटवण्यासाठी वेळ लागणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. बातमी लिहेपर्यंत वाहतूक पूर्ववत झालेली नव्हती.
हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी आणि वाहनचालकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews
#Chandrapur #MulRoad #TreeFall #TrafficJam #HeavyRain #StormAlert #RoadBlocked #WeatherUpdate #Chichpalli #BreakingNews
#चंद्रपूर #चिचपल्ली #वृत्तपत्रवाचन #वृत्त #विजेचा पाऊस #झाडकोसळले #वाहतूकठप्प #मुलमार्ग #वादळीवारा #अपघातवृत्त

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here