– रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०७ : येथील उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) परिसरातील प्रसाधनगृहाला अनपेक्षितपणे कुलूप लावण्यात आले असून, त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अनेक वृद्ध, महिलांना आणि लांबून प्रवास करून येणाऱ्या रुग्णांना अत्यंत असुविधाजनक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून या बंदीविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रसाधनगृह का बंद ठेवण्यात आले, याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.
“सरकारी रुग्णालयात अशा प्रकारची मूलभूत सुविधा बंद ठेवणे म्हणजे रुग्णांच्या गरजा आणि सन्मानाचा अवमानच आहे,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.
स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने प्रसाधनगृह पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #KurkhedaHospital #PatientStruggles #ToiletLocked #HealthcareNeglect #BasicNeedsDenied #HospitalMismanagement #RightToHealth #PublicHealthCrisis #PatientRights #SanitationCrisis
#कुरखेडा_रुग्णालय #रुग्णांची_गैरसोय #प्रसाधनगृह_बंद #आरोग्यसेवेचा_अभाव #सरकारी_दाखवलेली_दुरवस्था #मूलभूत_सुविधांचा_अभाव #रुग्णालय_प्रशासनाची_दादागिरी #जनतेचा_आक्रोश #आरोग्य_हक्काचा_अपमान #गडचिरोलीबातमी