आमदार गजबेसह हजारो भाविकांनी घेतला गोपालकाला व महाप्रसादाचा लाभ

306

-सप्ताहभर डॉ. प्रा.प्रशांत ठाकरे यांच्या अमृतुल्य वाणीतून कोरेगाव वाशी झाले मंत्रमुग्ध
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, ८ जानेवारी : तालुक्यातील कोरेगाव येथे १ जानेवारीपासून सुरू झालेल्या श्रीमद् भागवत ग्रामगीता तत्त्वज्ञान यज्ञ सप्ताहाचा समारोप ०७ जानेवारी रोजी गोपालकाला महाप्रसाद वितरणाने झाला. सप्ताह दरम्यान हरिभक्त परायण प्राध्यापक डॉ. प्रशांत ठाकरे महाराज यांनी आपल्या संगीतमय मधुर वाणीतून भाविकांना प्रवचनातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कोरेगाव वासियांच्या वतीने येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या भागवत सप्ताहाचे प्रवचन ऐकण्यासाठी तालुक्यातील भाविक महिला पुरुष दररोज या कार्यक्रमात हजेरी लावत. त्याचप्रमाणे गोपालकाल्यासाठी व समारोपीय कार्यक्रमासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाल उइके सह हजारो भाविकांनी महाप्रसाद व काल्याचा लाभ घेतला. यादरम्यान कोरेगाव येथील अनाथ विद्यार्थिनी शितल शामराव कुळमेथे हे नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाल्याने हिचा सत्कार सुद्धा आमदार गजबे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान गौर नगर येथील जय दुर्गा जुनियर कॉलेज च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सुद्धा गावात आयोजन केलेले होते. या शिबिराचे समन्वयक प्राध्यापक भूपेंद्र चव्हाण व चमू ने गावामध्ये साफसफाई व श्रमदान केले. श्रीमद् भागवत ग्रामगीता तत्वज्ञान सप्ताहाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा समस्त गावकरी वृंद कोरेगाव यांनी सहकार्य केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (MLA Gajbe)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here