संत सेवालाल महाराज यांचे विचार आजही प्रासंगिक : ॲड. उमेश वालदे
– शिवणी तांड्यात २८७ वी जयंती उत्साहात साजरी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १६ : शिक्षणाची औपचारिक पार्श्वभूमी नसतानाही दूरदृष्टी, तर्कनिष्ठ विचार आणि समाजप्रबोधनाचा ध्यास घेणारे यांनी सुमारे २५० वर्षांपूर्वीच पाण्याच्या टंचाईचे भाकीत केले होते. भविष्यात पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागेल, असा इशारा त्यांनी त्या काळात दिला होता. विज्ञाननिष्ठता, बुद्धीप्रामाण्यवाद आणि अंधश्रद्धाविरोधी विचारांची शिकवण देत त्यांनी अनुयायांना तर्काधारित जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजच्या काळात अधिकच प्रासंगिक ठरतात, असे प्रतिपादन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. उमेश वालदे यांनी केले.
गोर बंजारा समाज, शिवणी तांडा यांच्या वतीने यांची २८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ॲड. वालदे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी येथील बसस्थानक प्रमुख राजेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच मंजुळा मारगाये, शिक्षक मनोहर गावळ, उपसरपंच कूसन पूराम, हिरामन लंजे, तुकाराम मारगाये, शेषराव मसराम, वेदांत राठोड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने संतांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. महिला भगिनींनी पारंपरिक बंजारा वेशभूषा व अलंकार परिधान करून समाजाची ओळख दर्शविणारे पारंपरिक नृत्य सादर केले. सांस्कृतिक सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तांडा शिवणीचे नायक विजय मूळे, उपनायक अजय राठोड, नूतन पवार, पतिराम नूंनसावंत, किशोर मूळे, मानसिंग वलते, राजेश राठोड, मोहन पवार, प्रेमलाल पवार, भूपेंद्र मूळे, सूकचरण नूंनसावंत, शिवचरण मूळे, आसाराम मूळे, अमरसिंग राठोड, बोधनसिंग मूळे तसेच लता मूळे, पुष्पा पवार, गंगाबाई पवार, सुनिता राठोड, उर्मिला वलते, भाग्यश्री मूळे, मिराबाई मूळे, विमल मूळे, अनुशा मूळे, जयश्री मूळे, पार्वता मूळे आणि समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
जयंतीनिमित्त समाजएकतेचा संदेश देत संतांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.














