– शिक्षकांवरील अन्याय दुर करण्याची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ डिसेंबर : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी २ जानेवारी २०२३ रोजी शासनाच्या २८ डिसेंबर २०२२ च्या अधिसुचनेचा काळी फीत लावुन निषेध केला.
त्यात गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बेडगाव, धानोरा जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात, चामोर्शी, धानोरा, मोहली, कुरुड, बेळगाव, सिरोंचा, एटापल्ली, घोट, कोनसरी, अशा एकुण १० शाळेतील शिक्षक जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूल, माध्यमिक शाळा हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली. आधी शाळेतील शिक्षक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्यात इंग्रज राजवटी पासून सुरू असलेल्या शासकीय शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समाजातील गरीब व वंचित गटातील विद्यार्थ्यांना विद्यार्जनाचे कार्य करीत आहेत. तेव्हापासून आजता गायत शिक्षक जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ मध्ये समाविष्ट होते व त्यामुळे सेवा जेष्ठतेच्या आधारे राजपत्रित अधिकारी वर्ग २ ची एकमेव पदोन्नती उपशिक्षणाधिकारी व त्तसंमपदावर होत होती. परंतु २८ डिसेंबर २०२२ ला शासनाने अधिसूचना काढून त्यात सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक वर्ग ३ यांना जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ मधून वगळल्याने शिक्षकांना मिळणारी एक मात्र पदोन्नती हिसकावून अन्याय केलेला आहे. शासनाने आमच्यावर अन्याय करुन आमचा घात केलेला आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक वर्ग ३ या अन्यायकारक अधिसूचनेचा काळी फीत लावून शिक्षकांनी निषेध करीत केला.
२८ डिसेंबर २०२२ ची अधिसूचना रद्द करा व ५ जुलै २०१६ ची अधिसूचना कायम करा अशी मागणी अन्यायग्रस्त माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा जिल्हा गडचिरोली येथील शिक्षक डी. टी .कोहाडे, रश्मी डोके, पी.व्ही. साळवे, एस.एम. रत्नागिरी, व्हि.एम. बुरमवार, पी.बी .तोटावार, स्नेहा हेमके व रजनी मडावी यांनी केले आहे.
