रांगी येथे सिकलसेल विशेष अभियानाचा शुभारंभ
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १७ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिकलसेल आजार प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकलसेल विशेष अभियानाचा शुभारंभ सरपंच मान. सौ. फालेश्वरी प्रदीप गेडाम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा धुर्वे, आरोग्य सहाय्यक एस. एन. राजगडे, डी. के. वनकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शैलेश जांभुळे, औषधनिर्माण अधिकारी अंकित हेंमके यांच्यासह एल. बी. हिचामी, श्रीमती कोकडे, शितल सूर्यवंशी, अनिता चापडे, पेंदाम तसेच आशा वर्कर उपस्थित होत्या.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अरुणोदय सिकलसेल विशेष अभियानांतर्गत सर्व नागरिकांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. तसेच सिकलसेल हा आनुवंशिक आजार असल्याने मुलगा व मुलगी दोघांनीही विवाहापूर्वी रक्त तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सिकलसेलग्रस्त अपत्य जन्माला येऊ नये, यासाठी समाजात जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असून या अभियानातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.














