झाडीपट्टीचं ‘साजणी तुझा पदर सावर’ महाराष्ट्रात सुसाट व्हायरल
– महिन्याभरात २० लाखांहून अधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : मोबाईलवर स्क्रोल करताना अचानक कानावर पडणारी ती ओळ… “साजणी तुझा पदर सावर…” आणि क्षणात मन त्या सुरांत गुंतून जातं. झाडीपट्टीच्या ग्रामीण संस्कृतीचा गंध जपणारे ‘साजणी तुझा पदर सावर’ हे गाणे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे
झाडीपट्टीच्या ग्रामीण संस्कृतीतून जन्मलेलं हे गाणं सध्या महाराष्ट्रातील संगीतप्रेमींना अक्षरशः भुरळ घालत आहे. अवघ्या महिन्याभरात या गाण्याने २० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हे गाणं पाहिलं-ऐकलं असून, अनेकांच्या प्ले-लिस्टमध्ये ते आवर्जून सामील झालं आहे. यामुळेया गाण्याने झाडीपट्टी संगीतप्रेमींमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली आहे.
HK Production च्या माध्यमातून साकारलेलं हे गाणं केवळ ऐकण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर गावाकडच्या आठवणी, प्रेमाची निरागसता आणि नात्यांमधील हळवे क्षण जागवून जातं. अनिल मिसार यांचे सहज, मनाला भिडणारे शब्द आणि आवाज, त्याला लाभलेलं अक्षय मेश्राम यांचं मधुर संगीत यामुळे हे गाणं एकदा ऐकल्यावर पुन्हा-पुन्हा ऐकावंसं वाटतं.
गाण्याच्या दृश्यांमध्ये अनिल मिसार आणि मेघना उइके यांचा अभिनय कमालीचा नैसर्गिक वाटतो. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथील निसर्गरम्य परिसरात झालेलं चित्रीकरण गाण्याच्या भावनेला अधिक खोलवर पोहोचवतं. राज सार्वे यांचं छायांकन आणि लक्ष्मण माहुले व रणधीर निमजे यांचं नेमकं संपादन पाहताना डोळे-मन दोन्ही तृप्त होतात.
या गाण्याची निर्मिती सौ. पुष्पाबाई येमाजी कोसमशिले यांनी केली असून दिग्दर्शन होमदेव येमाजी कोसमशिले यांचं आहे. सह-निर्माते होमदेव कुरवटकर, कुंदन कस्तुरे व दुषांत कुकुडकर, तसेच संयोजक दुर्गेश धकाते, दीपक निमजे व दीपक ईश्वरकर यांनीही या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
विशेष म्हणजे हे गाणं YouTube सह भारतातील सर्व प्रमुख ऑनलाईन म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, शहरापासून गावापर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक ते आवडीने ऐकत आहेत. झाडीपट्टीतील ग्रामीण कलाकारांना नवं व्यासपीठ देण्याचा HK Production चा हा प्रयत्न रसिकांकडून कौतुकास्पद प्रतिसाद मिळवत आहे.
इतर प्लॅटफॉर्मवर गाणं ऐकण्यासाठी
🔗https://links.theblackturn.com/9C34ZWH6
अजून ऐकलं नसेल, तर हे गाणं नक्की ऐका — ‘साजणी तुझा पदर सावर’
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #SajaniTuzhaPadarSavar #ZadipattiSong #MarathiSong #MarathiMusic
#ViralMarathiSong #RuralMusic #FolkMusic #MaharashtraTrending #HKProduction #IndianFolkMusic #YouTubeTrending #RegionalMusic
#Gondia #NavegaonBandh #MarathiCulture













