काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्या निमित्य सजत आहे बाजारपेठ

176

The गडविश्व
ढाणकी / प्रवीण जोशी, १८ मार्च : साडेतीन मुहूर्तापैकी एक असे पवित्र मानाचे स्थान गुढीपाडव्याला समजले जाते. तसेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थातच गुढीपाडवा हे नववर्ष आता अगदी जवळ येऊन ठेपलाय याचे स्वागत करण्यासाठी दुकानदारांनी आपली दुकाने स्वच्छ साफसफाई व विविध नवनवीन वस्तूंचा साठा ग्राहकाला उपलब्ध करून आपली दुकाने सुसज्ज केली आहेत. तसे गुढीपाडव्याला जी सामग्री लागते ती दुकानात उपलब्ध कसे करता येईल असेच प्रयत्न व्यापारी बांधवांचा दिसतो आहे तसेच गुढीपाडव्याला काही दिवस बाकी असताना आपल्या आर्थिक क्षमतेनुसार गुढीपाडव्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहक येताना दिसत आहेत.
पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीला अनुसरून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि याच दिवसांपासून नवरात्रीची सुरुवात सुद्धा होते. गुढीपाडव्याचा अर्थ विजयी पताका गुडी म्हणजेच पताका आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा असे संबोधले जाते. यावर्षी गुढीपाडवा २२ मार्च रोजी येतो आहे व गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक तसेच हिंदू नववर्षाची सुरुवात सुद्धा या सणापासूनच मानली जाते. गुढीपाडवा या नववर्षाला अनुसरून पंचांगाची पूजा आणि वाचन सुद्धा केल्या जाते म्हणूनच ज्येष्ठ नागरिक पंचांगाची व गुढीपाडव्याला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत व साखरेपासून बनवलेल्या गाठ्यांची खरेदी करताना सुद्धा महिला मंडळ व लहान मुले तसेच शेतकऱ्याच्या दृष्टीने सुद्धा गुढीपाडवा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. शेतातील लागणारी जी साहित्य असतात पास, विळा, विडी, या सर्व बाबी स्वच्छ करून त्याचे सुद्धा पूजन केले जाते व वर्षभर शेत साफ करण्यास मदत केली. अशा प्रकारची एक कृतज्ञता सुद्धा आपल्या अवजाराप्रती शेतकरी बांधव या दिवशी व्यक्त करत असतात.

विशेषता सोने खरेदीसाठी इतर सणापेक्षा गुढीपाडव्याला विशेष महत्त्व देतात साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून या तिथीकडे ग्राहक बघतात व भविष्यातील काही सोन्याच्या रूपाने बचत ठेव असावी तशा प्रकारची तरतूद म्हणून ग्राहक सोने खरेदी करत असतात काम पडल्यास सोने त्वरित मोडून कधीही पैसे व ठोक रक्कम उभी करू शकतो त्यामुळे यावेळी ग्राहक सोन्याच्या स्वरूपाने खरेदी करत असतात.
-धीरज शामसुंदर कोडगिरवार
संचालक शिव ज्वेलर्स,ढाणकी

(The gadvishva) (The gdv) (MLA Krushna Gajbe) (Gadchiroli Armori news updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here