गडचिरोली जिल्ह्यात आजवरचा सर्वाधिक पाऊस पुराडा मंडळात : जिल्हा सरासरी ४०.१ मिमी

13

The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : गडचिरोली जिल्ह्यात २५ जून रोजी सर्व तालुक्यांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ४४ पैकी सर्व ४४ पर्जन्यमापन केंद्रांनी पावसाची नोंद केली असून जिल्ह्याचा एकूण सरासरी पाऊस ४०.१ मिमी इतका झाला आहे.

तालुकानिहाय पावसाची माहिती खालीलप्रमाणे आहे :

गडचिरोली : २३.९ मिमी
धानोरा : २५.३ मिमी
देसाईगंज : २७.० मिमी
आरमोरी : २१.० मिमी
कुरखेडा : ४९.२ मिमी
कोरची : ६१.७ मिमी
चामोर्शी : २२.० मिमी
मुलचेरा : ७१.२ मिमी
आहेरी : ५०.५ मिमी
सिरोंचा : १०.५ मिमी
एटापल्ली : ५९.३ मिमी
भामरागड : ५९.९ मिमी

जिल्ह्यात आज सर्वाधिक पाऊस कुरखेडा तालुक्यातील पुराडा मंडळात ११०.६ मिमी इतका नोंदवला गेला. त्यामुळे ते जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेली ठिकाणे (६ ठिकाणी ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस ):

पुराडा (ता. कुरखेडा) – ११०.६ मिमी
कोरची (ता. कोरची) – ९७.६ मिमी
मुलचेरा (ता. मुलचेरा) – ७१.२ मिमी
भामरागड (ता. भामरागड) – ७०.० मिमी
एटापल्ली (ता. एटापल्ली) – ६७.० मिमी
पेरमिली (ता. आहेरी) – ६७.० मिमी

जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर समाधानकारक असून, शेती हंगामासाठी ही परिस्थिती अनुकूल असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनानेही पावसाच्या नोंदीवर लक्ष केंद्रित केले असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchiroinews #Gadchiroli #RainfallUpdate #Monsoon2025 #HeavyRainfall #MaharashtraWeather #DistrictRain #Kurkheda #Purada #Korchi #Mulchera #Etapalli #Bhamragad #Aheri #WeatherNews #RainAlert #Agriculture #KharifSeason
#गडचिरोली #पावसाचा_आढावा #महाराष्ट्रपाऊस #मॉनसून२०२५ #अतिवृष्टी #पुराडा #कुर्केडा #कोरची #मुलचेरा #भामरागड #एटापल्ली #पेरमिली #खरीपहंगाम #पावसाचीनोंद #हवामानवृत्त #गडचिरोलीपाऊस #विदर्भपाऊस #जिल्हापावसाचीमाहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here