धानोऱ्यात स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन थकित

10

धानोऱ्यात स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन थकित
– जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २८ : धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनेऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या तीन महिन्यांचे थकीत कमिशन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार २७ जानेवारी २०२६ रोजी माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, स्वस्त धान्य दुकानदारांचे संपूर्ण कुटुंब या कमिशनवर अवलंबून आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कमिशन न मिळाल्याने दुकानदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुकानदारांचे कमिशन दरमहा नियमितपणे मिळावे, अशी ठाम मागणी संघटनेने केली.
यावेळी माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी सध्या निधीअभावी कमिशन अदा करण्यात आले नसल्याचे स्पष्ट करत, निधी मंजूर होताच थकीत रक्कम संबंधित दुकानदारांच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासन दिले.
निवेदन सादर करताना धानोरा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जाकीर कुरेशी, सचिव माणिक गेडाम, कोषाध्यक्ष समीर कुरेशी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here