– बालगोपालांनी सजवलेले सर्जा-राजा, खावू व भोजऱ्याचे वाटप
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २४ : येथे सार्वजनिक सीताबाई भांडारकर हनुमान मंदिरात तान्हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरी राजाच्या साथीदार असलेल्या बैलजोडीचे पूजन करून बालगोपालांनी झडत्या म्हटल्या व बैलपोळ्याची आरती केली. त्यानंतर लहानग्या बालकांना खावू व भोजऱ्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक जयंत पाटील हरडे, विभूतराव भांडारकर, विठ्ठलराव खानोरकर, पोलीस पाटील योगेश नाकाडे, प्रा. विनोद नागपूरकर, सरपंच उर्मिला हलामी, उपसरपंच मधुकर गावडे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व बालगोपाल उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या जीवनातील श्रम व बैलजोडीचे महत्व अधोरेखित करणारा हा पारंपरिक सण कुंभिटोल्यातील बालगोपालांनी आनंद व उत्साहात साजरा केला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #the














