– बालगोपालांच्या नंदीबैल सजावटीने रंगतदार स्पर्धा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : येथील शिव मंदिर समितीच्या वतीने तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील शिव मंदिर परिसरात लहान बालगोपालांनी सजवलेल्या नंदीबैलांची रंगतदार मिरवणूक काढण्यात आली. ही रॅली हनुमान मंदिरापर्यंत नेण्यात आली.
मिरवणुकीनंतर बालगोपालांच्या नंदीबैल सजावट स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे परीक्षक दौलत वरवाडे, वाघाडे सर, येरमे मॅडम आणि सौ. देवीताई चौधरी यांनी नंदीबैल व बालगोपालांच्या सादरीकरणाचे परीक्षण केले. सजावट स्पर्धेत मयंक उईके याने प्रथम, ट्विंकल चिलबुले व भूपतवार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्यांमध्ये शिवांश कुंडू (प्रथम), राम धाइत व अन्वी मोहरले (द्वितीय) ठरले.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपयांची रोख पारितोषिके तसेच प्रसाद देण्यात आला. याशिवाय तेजस पेंद्याला, श्रेयस झांबरे, सुशांत बावणे, सचिन श्रीपतवार, सोहम करकडे, प्रतीक निके, श्रेयस उडगिलवार, लकी खरवडे, मृगल गवर्णा, सारंग निंभोरकर, प्रचित मशागतरी, स्पृशा काळे, इमाने गुरनुले, खुशी गुरनुले, आर्वी चलाख, पंखुडी सहारे, डेव्हिड सहारे, लावण्या गेडाम, लावण्या साखरकर, ओवी ठाकरे आदींना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, श्रीकृष्ण अशा विविध ऐतिहासिक व धार्मिक वेशभूषांनी बालगोपालांनी आकर्षण निर्माण केले. काही स्पर्धकांनी घोषवाक्ये देऊन नागरिकांचे लक्ष वेधले. या पारंपरिक सोहळ्यामुळे संपूर्ण धानोरा शहरात आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














