The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २५ : तालुक्यातील रांगी गावात यंदा प्रथमच तान्हा पोळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. २३ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच लहानग्यांमध्ये सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
गावातील समाज मंदिरात नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रंगीबेरंगी सजावट, तोरणे, फुगे आणि आकर्षक रंगरंगोटीमुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता. गावातील अनेक नंदीबैलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. परीक्षकांनी सजावटीचे परीक्षण करून विजेत्यांची घोषणा केली. सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
गावकरी, महिला, पुरुष, युवक-युवती आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक सणाचा आनंद लुटला. नंदीबैलाच्या पोळ्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )














