The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : विकासाच्या गाजरामागे लपवलेली गडचिरोलीची उपेक्षा अखेर काँग्रेसने उघडकीस आणली! राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काँग्रेसने थेट त्यांच्या कार्यशैलीवर सडकून टीका करत “लॉलीपॉप-चॉकलेट वाटप आंदोलन” केलं.
काँग्रेसने आरोप केला की, “मुख्यमंत्री फडणवीस हे केवळ घोषणा आणि आश्वासनांची लॉलीपॉप वाटतात, मात्र जिल्ह्यातील बेरोजगारी, आदिवासी हक्क, महिलांच्या अडचणी, शेतकऱ्यांची वणवण याकडे आजवर कधीही गांभीर्याने लक्ष दिलं नाही.” त्यांच्या गडचिरोली दौऱ्यांमध्ये सामान्य जनतेशी थेट संवाद टाळून, फक्त फोटोसेशन व घोषणांची खैरात करण्यात आली असल्याचा काँग्रेसचा रोष होता.
याच निषेधार्थ काँग्रेसने केक कापून चॉकलेट व लॉलीपॉपचं वाटप करून मुख्यमंत्री फडणवीसांना ‘गोड भाषणांचा आणि फोल आश्वासनांचा प्रतीकात्मक आरसा’ दाखवला.
या तीव्र आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आमदार रामदास मसराम, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, तसेच तालुकास्तरावरील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“मुख्यमंत्र्यांनी केवळ ‘लॉलीपॉप राजकारण’ केलं, गडचिरोलीचा खरा विकास अजूनही तोंडावरच!” — असा संतप्त सवाल या आंदोलनातून काँग्रेसने उपस्थित केला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #गडचिरोली #काँग्रेसआंदोलन #लॉलीपॉपराजकारण #देवेंद्रफडणवीस #राजकीयप्रत्युत्तर #मुख्यमंत्रीवाढदिवस #चॉकलेटवाटपआंदोलन #गडचिरोलीउपेक्षा #SymbolicProtest #FakePromises #PoliticalSatire #CongressVsFadnavis
#FadnavisBirthdayProtest #LollipopPolitics #GadchiroliIgnored #CongressAttack #SymbolicProtest #FakePromises
