– आत्महत्येचे कारण अस्पष्ट
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ७ जानेवारी : तालुक्यातील मेंढा येथील विवाहीत इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. नरेशा कुमोटी (३८) रा. मेंढा (लेखा) असे मृतकाचे आहे.
मृतक हा आपल्या परिवारासह मेंढा येथे राहत होता. दरम्यान ६ जानेवारी रोजी रात्रोच्या सुमारास घरचे व्यक्ती झोपल्यावर घराशेजारी असलेल्या आपल्या शेताजवळील चिंचेच्या झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो घरी न दिसल्याने गावात शोधाशोध केली परंतु तो मिळाला नाही. सकाळी शोध घेतला असता तो झाडाला गळफास घेतलेला आढळुन आला. मृतकास ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (IND बनाम SL) (Tottenham vs Portsmouth) (Villarreal vs Real Madrid) (Delhi Mayor Election)(Muktipath) (suicide by hanging herself in Mendha)