मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धानोऱ्यात रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

19

The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : मुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, तालुका धानोरा यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या गडचिरोली येथील कर्तव्य कक्ष क्र. १ येथे संपन्न झाले.
या शिबिरात भाजपच्या २२ कार्यकर्त्यांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
रक्तदात्यांमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष साजन कैलास गुंडावार यांच्यासह सारंग साळवे, सुभाष धाईत, सौरव सहारे, जय करकाडे, रोहित लाजूरकर, बबलू मालाकर, पवन येरमे, सुरज गेडाम, प्रवीण बोडकेवार, निखिल जराते, प्रणय शेंडे, सौरभ श्रीपतवार, संदीप आखाडे, आकाश पुढो, अमोल भलवे, पराग देशपांडे, मोहन गंडाटे, स्वराज धाईत, भक्त दास गडपायले, विनोद कीरंगे आणि गजानन परचाके यांचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजू कुंडू, राकेश खरवडे, अनिल मशाखेत्री, सरफराज शेख, प्रकाश कुर्जेकर, नरेश निमलवार, सुजित दास, सुभाष खोबरे व घनश्याम मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि सर्व रक्तदात्यांचे भाजपा परिवारातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here