विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे : डॉ. दिलीप बरवे

5

– बनपूरकर वाणिज्य महाविद्यालयात कृतज्ञता सोहळा व स्वागत समारंभ संपन्न
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १२ : तालुक्यातील पांडुरंग बनपूरकर वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कृतज्ञता सोहळा आणि नवविद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित नगरसेवक डॉ. दिलीप बरवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “उपलब्ध शैक्षणिक संधींचा लाभ घेत आत्मनिर्भर व्हा, ही संधी जीवन घडविणारी आहे,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर होते. त्यांनी आपल्या भाषणातून वाणिज्य शिक्षणातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करत ‘कमवा व शिका’, राष्ट्रीय सेवा योजना, करिअर कट्टा यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व जबाबदारी वाढविण्यावर भर दिला.
कार्यक्रमात नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा सयाम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुबारक अली सय्यद, व्यावसायिक मुस्ताक कुरेशी, माजी बँक व्यवस्थापक विठ्ठल कोवे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत कोराम, सरपंच शेवंता हलामी, सारंग साळवे, अनिल बनपूरकर, गिरीधर सोनुले, पूनम किरंगे, दीपा उसेंडी, कुलदीप इंदूरकर, उमेश कुमरे, संजय बनपूरकर, पुष्पराज उंदिरवाडे, नरेश खोबे आदी मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेश जोशी यांनी तर आभार प्रा. अंकित बनपूरकर यांनी मानले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here