– ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ९ सप्टेंबर : तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड.क्रमांक ३ कडे जाणाऱ्या मार्गावरील विद्युत दिवे मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने मार्गावरुन प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांना, प्रवाशांना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रांगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धानोरा मार्गावरील वार्ड क्रमांक ३ कडे जाणाऱ्या रस्तावरील पथ दिले मागील तिन महिन्यांपासून बंद पडलेले आहेत. हि बाब ग्रामपंचायती च्या निदर्शनास आणून दिले असतानाही याकडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष होत असल्याने गावातील लोकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
रांगी ते नविरांगी (वार्ड न.३) यातील अतंर ५०० मिटर असुन नविरांगी येथिल लोकांना दररोज रात्री कधिही रांगी गावात यावे लागते. रुग्णाना दवाखान्यात घेऊन जावे लागते. या रस्त्यावर झाडे झुडपे असुन अंधार पसरलेला असतो. अशातच साप विंचवाने एखाद्या ला दंश केल्यास जबाबदार कोण? खरेतर या मार्गावरील इलेक्ट्रिक पोलवरती पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी लाईट लावले जात होते पण ग्रामपंचायत कार्यालयाला गावातील दिवाबत्ती कडे लक्ष दयायला वेळ मिळत नसल्याचा आरोप गावकरी करताना दिसतात.
मागिल तिन महिन्यांपासून पथदिवे नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी अंधारात येजा करायचे कसे. धानोरा तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत मोठी असुन परिसराची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. परिसरातिल लोक दररोज कामासाठी रांगी गावाला येतच असतात. भर पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावरील खांबावर दिवे नाममात्र पोलवर लटकलेली दिसतात. तर काही खांबाना दिव्यांचा पत्ताच लागत नाही. त्यामुळे रात्री विद्युत लाईटा अभावी अंधार पसरलेला असतो. गावात फिरताना उजेड आवश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? गावातील लाईट लावले जात नसतील तर दिवाबत्ती कर कशाला भरायचा असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत.तरी ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच दखल घेऊन पथदिवे लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
