– 83 रुग्णांची तपासणी, 15 आयुष्मान कार्डांची नोंद
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १४ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत धानोरा तालुक्यातील रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. रांगी आणि मिचगाव ग्रामपंचायतींच्या संयुक्त सहभागातून झालेल्या या शिबिरात एकूण 83 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
आरोग्य तपासणीसोबतच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 15 कार्डे तयार करण्यात आली. रांगी येथील 58 आणि मिचगाव येथील 25 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. याशिवाय बीपी, आरबीएस, एचबी आदी महत्त्वाच्या तपासण्या करून नागरिकांचे आरोग्य परीक्षण करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. भरत फंड, डॉ. पूजा दुर्वे, आरोग्य सहाय्यक सुरेश राजगडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शैलेश जांभुळे, ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोळे, औषध निर्माण अधिकारी अंकित हेमके, परिचारिका हिचामी, CHO हर्षद गावंडे, मलेरिया वर्कर संदीप मडावी, HLL प्रतिनिधी हेमलत्ता लोहबरे, आशा वर्कर्स शीतल सूर्यवंशी व अनिता चपले, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी नितेश गेडाम, नामदेव बैस, नितीन कावळे (DEO रांगी) आदींची उपस्थिती लक्षणीय होती.
या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी व्यापक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














