रांगी ग्रामपंचायतीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

10

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २३ : रांगी ग्रामपंचायतीच्या वतीने २२ जून २०२५ रोजी समाज मंदिरात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात कान, नाक, घसा, कर्करोग व अन्य आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे वितरित केली. एकूण २०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरासाठी डॉ. नारिंगे (कान-नाक-घसा व कर्करोग तज्ज्ञ, ख्रिस्तानंद ब्रह्मपुरी), डॉ. आशिष सावंत (MBBS, नागपूर), डॉ. जुमनाके (जनरल सर्जन, मेडिसिन, नागपूर), फार्मासिस्ट विलास चौधरी (ख्रिस्तानंद ब्रह्मपुरी) आणि अजित महाजन (ब्रह्मपुरी) यांनी आपली सेवा दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. फाल्लेश्वरी प्रदीप गेडाम यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, उपसरपंच नूरज हलामी, सदस्य दिनेश चापले, राकेश कोरम, सौ. अर्चनाताई मेश्राम, सौ. विद्या ताई कपाट, सौ. वच्छला हलामी, सौ. शशिकला मडावी आणि ग्रामपंचायत सचिव मकरंद बी. बांबोळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here