डिएपीच्या टंचाईवर उपाय : शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा

24

– कृषी विभागाचे आवाहन
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २२ : राज्यात खरिप हंगामाला सुरुवात झाली असून, सध्या शेतकऱ्यांमध्ये डिएपी (Di-Ammonium Phosphate) खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, मर्यादित पुरवठ्यामुळे डिएपी खताची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
डिएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद हे अन्नद्रव्ये असतात. याला पर्याय म्हणून सध्या देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले एसएसपी (Single Super Phosphate) हे खत उपयुक्त ठरते. यात १६ टक्के स्फुरदबरोबरच सल्फर व सूक्ष्म अन्नद्रव्ये असून, विशेषतः तेलबिया पिकांसाठी हे खत फायदेशीर आहे. डिएपीच्या एका गोणीऐवजी युरियाची अर्धी गोणी आणि एसएसपीच्या तीन गोण्या वापरल्यास डिएपीचा उत्तम पर्याय मिळू शकतो.
यासोबतच एनपीके 10:26:26, 20:20:0:13, 12:32:16 आणि 15:15:15 अशा संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश या सर्व अन्नद्रव्यांची संतुलित मात्रा प्राप्त होते. टिएसपी (Triple Super Phosphate) खतामध्ये देखील ४६ टक्के स्फुरद असून, ते देखील डिएपीला पर्यायी ठरू शकते.
शेतकऱ्यांनी या पर्यायांचा वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीचा अंगीकार करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा विचार करून उत्पादनात वाढ साधता येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #FertilizerAlternatives #DAPSubstitute #AgricultureAwareness #FarmerGuidance #KharifSeason #BalancedFertilization #CropNutrition #SoilHealth #Gadchiroli #Dhanora #SustainableFarming #NPKFertilizers #पर्यायीखते #डिएपीपर्याय #कृषीमाहिती #शेतकरीमार्गदर्शन #धानोरा #गडचिरोली #खरिपहंगाम #संतुलितखतव्यवस्थापन #NPKखते #कृषीविभाग #शेतीउत्पादन #फर्टिलायझरअल्टरनेटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here