सिकलसेल आरोग्य शिबिरातून रुग्णांना दिलासा : नि:स्वार्थ सेवेचा आदर्श उपक्रम

56

सिकलसेल आरोग्य शिबिरातून रुग्णांना दिलासा : नि:स्वार्थ सेवेचा आदर्श उपक्रम
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २५ : ‘मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हा विचार अंगीकारून आरोग्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश कटरे यांच्या पुढाकारातून गुरुदेव सेवा मंडळ, कुरखेडा येथे २४ रोजी सिकलसेल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात आदिवासी, गरीब व मागासवर्गीय समाजात आढळणाऱ्या सिकलसेल आजाराच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना मोफत तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन हिमेटोलॉजिस्ट तज्ञ डॉ. शैलेश बांबोर्डे (मुंबई) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कवाडकर होते. विशेष अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गहाणे, सिकलसेल सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सातपुते (चंद्रपूर) तसेच सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल उपस्थित होत्या.
डॉ. बांबोर्डे यांनी सिकलसेल आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी संगीता ठलाल यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. शिबिराला सिकलसेल रुग्ण व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश कटरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार रोहित लाडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here