शिवाजी महाविद्यालय कुरखेडाचे वरिष्ठ लिपिक श्याम पालकर यांचे निधन
– हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी अंत,आज कठानी नदीघाटावर अंत्यसंस्कार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : स्थानिक कन्नमवार वार्ड येथील रहिवासी व कुरखेडा येथील शिवाजी महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले श्याम कृष्णाजी पालकर (वय ५७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी निधन झाले.
सायंकाळी सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या निधनाने शिवाजी महाविद्यालयासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पालकर हे अत्यंत संयमी, प्रामाणिक व मृदू स्वभावाचे अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने महाविद्यालयातील सहकारी व विद्यार्थीवर्गावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी आज, गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कठानी नदीघाटावर पार पडणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














