खळबळजनक : आरमोरीत दुचाकी शोरूमची भिंत कोसळली

1416

– परिसरात खळबळ, जीर्ण इमारतीचा हादरवणारा परिणाम
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (चेतन गहाणे) दि. ०८ : शहरातील नागपूर मार्गावरील हिरो  कंपनीच्या दुचाकी शोरूमच्या मागील भिंतीचा मोठा भाग आज अचानक कोसळल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना आज शुक्रवारी घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नागपूर मार्गावरील हिरो शोरुम असलेली इमारत जीर्ण झाली असून आज अचानकपणे कोसळलेली भिंत जुनी आणि जीर्णावस्थेत असल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यामुळे भिंतीच्या मजबुतीवर परिणाम झाल्याने अचानकपणे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भिंत कोसळताच काहीजण त्याखाली अडकले गेले. यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवून मदतकार्य राबवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांच्याही मदतीने मदत व शोधमोहीम सुरू असून मृतांचा अचूक आकडा अजूनही स्पष्ट नाही. मात्र, आतापर्यंत तिघांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही ग्राहक व मजुरांचा समावेश असल्याचे कळते.
ही संपूर्ण घटना निष्काळजीपणाचा परिणाम असल्याची जोरदार चर्चा असून, प्रशासनाकडून इमारतीची स्थिती तपासून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान घटनेतील मृत्यू झालेले जखमींची नावे कळू शकली नाही. पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #armorinews #Armori #WallCollapse #ShowroomAccident #GadchiroliNews #MaharashtraNews #TragicIncident #BuildingCollapse #MonsoonHazard #RescueOperation #PoliceAction
#आरमोरी #अपघात #भिंतकोसळली #शोरूमअपघात #गडचिरोली #दुर्दैवीघटना #पावसाळीअपघात #बचावकार्य #पोलिसकार्यवाही #मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here