The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०६ : रांगी ते बेलगाव दरम्यानचा रस्ता सध्या जीवघेणा ठरत असून, या मार्गावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व प्रवाशांचे हाल सुरू आहेत. केवळ ६ किमी अंतरात डांबरीकरण उखडून रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे, ज्यामुळे अपघाताचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.
या मार्गावर गडचिरोलीकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. एस.टी. महामंडळाच्या बसगाड्यांपासून ते खासगी चारचाकी, दुचाकी वाहनांचे दररोज ये-जा सुरू असते. मात्र, रांगी व बेलगाव दरम्यानचा रस्ता पूर्णपणे खचलेला असून काही ठिकाणी रस्ता फुटलेला आहे. यामुळे वाहनचालकांना व प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गाने जाणारे शिक्षक, आरोग्य कर्मचारी, वन विभाग व बँक कर्मचारी यांच्यासह हजारो नागरिकांना दररोज प्रवास करताना पाठीचा व कमरेचा त्रास जाणवू लागला आहे. रस्त्याची ही दुरवस्था प्रशासनाच्या उदासीनतेचे दर्शन घडवत असून, मागील दुरुस्तीही अर्धवट करण्यात आली होती.
स्थानिक नागरिक, कर्मचारी आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी जोरदार मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास जनआक्रोश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

#thegadvishva #thegdv #gadchirolinews #रांगीतेबेलगावरस्ता #खड्ड्यांचीसाखळी #प्रवाशांचेहाल #रस्त्याचीदुरवस्था #गडचिरोलीवाहतूक #अपघातप्रवणरस्ता #प्रशासनाचीउदासीनता #रस्तादुरुस्तीचीमागणी
#RangiToBelgaonRoad #PotholeMenace #UnsafeTravel #RoadDamage #GadchiroliTraffic #AccidentProneRoute #PublicDemandRepair #PoorInfrastructure