खळबळजनक : अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

1517

– परिसरात खळबळ, हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे
The गडविश्व
गोंदिया, दि. १० : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील शेतशिवारात अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना सोमवार १० फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हत्येचा संशय व्यक्त करण्यात येते आहे.
सोमवारी सकाळी गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळच्या शेतशिवारात गावकऱ्यांना महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची माहिती गावकऱ्यांनी तात्काळ गोरेगाव पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाका केला. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही अशी माहिती असून सादर सदर महिला ही ३० ते ३५ वर्ष वयोगटातील असल्याचे समजते तर हि घटना घडली कशी हे कळू शकलेले नाही. दरम्यान महिलेच्या शेजारी दुसऱ्या बांधीत तणसाचे ढीग जळालेले आढळून आले आहे. घटनेबाबत हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत असून महिलेसोबत नेमके काय घडले हे पुढील तपासानंतरच कळू शकणार आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी पाहावयास मिळाली होती. सदर घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here