खळबळजनक : चंद्रपूरातील पोलीस अधिकाऱ्याने वृत्त संकलन करतांना पत्रकारास केली बेदम मारहाण

695

– ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ चा विसर, कारवाई करण्याची डिजिटल मीडिया असोसिएशनची मागणी
The गडविश्व
चंद्रपूर, ६ एप्रिल : येथील महाकाली यात्रा दरम्यान वृत्त संकलन करत असलेल्या डिजिटल मीडियाच्या पत्रकाराला चक्क पोलीस उपनिरीक्षकाने बेदम मारहाण करत पोलीस ठाण्यात नेल्याची खळबळजनक घटना ५ एप्रिल रोजी घडली. या घटनेने संपूर्ण पत्रकार बांधवात असंतोष निर्माण झाला असून सदर प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी डिजिटल मीडिया असोसिएशनसह डिजिटल मीडिया कार्यरत पत्रकार, संपादक तसेच इतरही पत्रकांकडून करण्यात येत आहे.
‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. म्हणजेच महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. असे असतांना मात्र चंद्रपुरात चक्क पोलीस उपनिरीक्षकास याचा विसर झाल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथे माता महाकाली यात्रा सुरू आहे. या दरम्यान यात्रेत आलेल्या भाविकांची गैरसोय होत असल्याचे कळताच पार्थशर समाचार चे शिकाऊ व्हिडीओ पत्रकार नेमन धनकर आणि सुनील देवांगन हे स्थळ गाठून वृत्त संकलन करत होते. यावेळी त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक गेडाम यांनी कोणतीही विचारणा न करता तसेच पत्रकार असल्याचा ओळखपत्र दाखवल्यानंतरही कोणतीही बाब ऐकून न घेता पत्रकार नेमन धनकर याला बेदम मारहाण करत पोलीस ठाण्यात नेले आणि एवढ्यावरच न थांबता त्याच्या हातातील मोबाईल हिसकाऊनमोबाईल मधील रेकॉर्डिंग डिलीट केली व एक तासानंतर सोडून देण्यात आले.
सदर प्रकरण अतिशय गंभीर असून एवढ्या उच्च पदस्थ अधिकारी असे कृत्य करीत असेल तर इतर काय ? त्या अधिकाऱ्यास एवढा उर्मटपणा आला कुठून ? पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याचा विसर पडला की काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून या घटनेने राज्यातील संपूर्ण पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जोर धरत आहे.

(The gadvishva) (the gdv) (chandrapur news) (digital media news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here