The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणासाठी नियोजित सोडत सभेचा दिनांक बदलण्यात आला असून, आता ही सभा १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता गोंडवाना कला दालन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे पार पडणार आहे. यापूर्वी ही सभा ९ जुलैला होणार होती.
शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सरपंच आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा निश्चित करण्यात येत असून, यासाठी ५ मार्च २०२५च्या अधिसूचनेऐवजी १३ जून २०२५च्या अधिसूचनेनुसार ही सोडत प्रक्रिया राबवली जाणार आहे.
तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार, गडचिरोली यांनी सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिकांना या महत्त्वाच्या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews # #गडचिरोली #ग्रामपंचायत #सरपंचआरक्षण #सोडतसभा #PanchayatElections #ReservationDraw #ग्रामविकास #MaharashtraRural #ElectionUpdate #LocalGovernance #गडचिरोलीबातम्या #GramPanchayatNews
#सरपंचनिवड #ग्रामसभा