The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १८ : तालुक्यातील शासकीय कंत्राटदार संघटनेची सभा नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात पार पडली. त्यात तालुका शासकीय कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षपदी सारंग साळवे यांची एकमताने निवड करण्यात आली.
स्थानिक विश्राम गृह येथे धानोरा तालुका शासकीय कंत्राटदार संघटनेची सभा नुकतीच आयोजित केली होती. सभेमध्ये तालुका शासकीय कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी निवडण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष म्हणून सारंग साळवे, उपाध्यक्ष म्हणून सर्फराज शेख ,सचिव म्हणून अनिस शेख, सल्लागार म्हणून तुफान उंदीरवाडे, रशीद खान व सदयस्य म्हणून भूषण मेश्राम, रशिकेत् पुसतोडे, सत्यवान कुंभार इत्यादी सदस्य उपस्थित होते. सभेदरम्यान संघटनेच्या विविध प्रश्नावर चर्चा करून त्यावर मंथन करण्यात आले. नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
