The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०७ : जिल्हा परिषद हायस्कूल, धानोरा येथील इयत्ता ८ वीतील विद्यार्थी सारंग बारीकराव मडावी याची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. त्याने आपल्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने हे यश संपादन करून शाळेचा गौरव वाढवला आहे.
सत्र २०२४-२५ मध्ये शाळेतील एकूण २१ विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सारंग मडावी शिष्यवृत्ती मिळवणारा विद्यार्थी ठरला आहे. ही शिष्यवृत्ती इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरवर्षी १२,००० रुपये या प्रमाणे एकूण ४८,००० रुपये मिळणार आहे.
या यशा बद्दल सुधीर आखाडे गटशिक्षणाधिकारी प. सं. धानोरा, व्ही. एम. सुरजुसे मुख्याध्यापक, सौ. वेणूताई मशाखेत्री अध्यक्षा व्यवस्थापन समिती, जमीर कुरेशी उपाध्यक्ष शा. व्य. समिती,पी. व्ही. साळवे, एन. बी. मेश्राम, पी. बी. तोटावार, ए. बी. कोल्हटकर, मोहन देवकात्ते, डॉ. रश्मी डोके, श्रीमती कांचन दशमुखे, कु.रेखा कोरेवार, सौ.प्रियंका आनंदवार, कु.किरण दरडे, हरीश पठाण, भालेराव,बादल वरघंटीवार,ओम देशमुख, कोहळे मॅडम, गेडाम, सहारे, जयराम कोरेटी,भालचंद्र कोटगले, सर्व पालकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन करत त्याच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले.
सारंगच्या या यशामुळे शाळेच्या गुणवत्तेला नवा आयाम मिळाला असून, इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्त्रोत ठरला आहे.
