The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १२ : जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताची कमतरता जाणवताच संकल्प फाउंडेशन समाजसेवी संस्थेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कुरखेडा व परिसरातील 29 उत्साही युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून मानवतेची सेवा साकारली.
रक्तदान शिबिरात भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक सागर निरंकारी, रुग्ण कल्याण समिती सदस्य विवेक निरंकारी व सिराज पठाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, सहाय्यक अधिसेविका पुष्पलता खवड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोनेश मेश्राम, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
गर्भवती माता, अपघातग्रस्त, सीकल सेल व थॅलेसिमिया रुग्ण, शस्त्रक्रियेनंतरचे रुग्ण अशा अनेकांना रक्ताची सतत गरज भासत असते. मात्र रक्तपेढीत कमतरता असल्याने वेळेवर रक्त उपलब्ध न होण्याची समस्या लक्षात घेऊन संकल्प फाउंडेशनने हा उपक्रम राबवला.
रक्तदान करणाऱ्यांमध्ये ईश्वर ठाकूर, डॉ. जगदीश बोरकर, डॉ. नितीन कटरे, दीपक धारगाये, चेतन गहाणे, फलींद्र मांडवे, भूषण बोरकर, विनोद नागपूरकर, पुष्पराज राहांगडाले, मृणाल माकडे, कैलास उईके, गणपत बनसोड, प्रीतम वालदे, जगदीश कुमरे, जितेंद्र वटी, राहुल पाटणकर, चैतन्य नरोटे, सागर इंदूरकर, निखिल फटिंग, उमेश पालकर, किशोर भोंडे, शैलेश कनेरिया, शैलेश खाडिलकर, संजय जनबंधू, अक्षय काळबांधे, अनिल धोंडणे, विनोद बोंडे, उत्तम शास्त्रकार आणि प्रीतम वाकडे यांचा समावेश आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि संकल्प फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #kurkhedanews
