– कृषि विभागाची कार्यवाही
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : जिल्ह्यात भात पिकांच्या रोवणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी खते खरेदीस सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर खतांचा योग्य व पारदर्शक पुरवठा व्हावा, शेतकऱ्यांची फसवणूक टळावी यासाठी कृषि विभागाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी एक पूर्णवेळ गुणनियंत्रण निरीक्षक नेमण्यात आला असून, भरारी पथके तयार करून खत विक्रीवर देखरेख ठेवली जात आहे. शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करून पक्की पावती घ्यावी, पावतीवरील तपशीलांची खात्री करावी, आणि जास्त दर आकारल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षात तक्रार करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

प्रशासकीय नियोजन :
कृषि विभागाने रासायनिक खतांचा संतुलित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तालुक्यानिहाय व महसूलमंडळानिहाय रेक पॉइंटवर नियोजन केले आहे. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेले काही महत्त्वाचे साठे पुढीलप्रमाणे –
इफको 20:20:0:13 – 1785 मेट्रिक टन
नर्मदा 20:20:0:13 – 1000 मेट्रिक टन
कोरोमंडल 20:20:0:13 – 700 मेट्रिक टन
इफको डीएपी – 918 मेट्रिक टन
एनएफएल युरिया – 600 मेट्रिक टन
या खतांच्या वितरणावर जिल्ह्यातील कृषि अधिकाऱ्यांचे नियंत्रण असून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडत असल्याचे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी खबरदारी घ्या, फसवणुकीपासून वाचण्यासाठी जागरूक राहा, आणि शासकीय यंत्रणांचा उपयोग करा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews
#FertilizerDistribution #FarmerAwareness #AgricultureMonitoring #GadchiroliUpdates #CropSeason2025 #ChemicalFertilizers #AgriDepartment #RevenueZoneSupply #DAP #Urea #FertilizerAvailability #KharifSeason #FarmerSupport #AntiExploitation #AgriHelpline
#खतवाटप #शेतकरीहक्क #कृषीविभाग #गडचिरोलीबातमी #महसूलमंडळ #गुणनियंत्रण #FertilizerDistribution #FarmerRights #AgricultureDepartment #GadchiroliNews #CropSeason #AgriInspection