आजपासून रेती घाटातील उपसा बंद : अद्याप मुदतवाढ नाहीच

290

– जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांचे आदेश
The गडविश्व
चंद्रपूर, १ मार्च : जिल्ह्यातील लिलाव झालेल्या चाळीस घाटातील वाळूचा उपसा आज १ मार्च पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पर्यावरण अनुमती प्राप्त होईपर्यंत घाटातून वाळूचे उत्खनन करताना आढळून आल्यास पर्यावरण अनुमती शिवाय केलेले उत्खनन अवैध समजून त्यावर महाराष्ट्र जमीन महसून अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) (८) अन्वये दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्याचवेळी साठवणुकीच्या ठिकाणी अनुज्ञेय असलेल्या परिमाणा एवढी वाळूची विक्री करण्यास परवानगी असेल असे जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी सांगितले.
जिल्ह्यातील घाटांना १० जून २०२३ पर्यंत उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे व ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत साठवण व विक्री करण्याची परवानगी घाटधारकांना देण्यात आली आहे मात्र या घाटांची पर्यावरण मान्यता २८ फेब्रुवारी पर्यंत होती व ह्या पर्यावरण मान्यतेला अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही.पर्यावरण मान्यता देण्याचे अधिकार राज्यस्तरीय पर्यावरण समितीला आहे. दरम्यान समितीची बैठक ११ फेब्रुवारी रोजी पार पडली मात्र अजूनही काय निर्णय घेण्यात आला ह्याची माहिती खणीकर्म विभागाला प्राप्त झाली नसल्याने विभागाने १ मार्च पासुन रेती घाट अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश दिले असल्याचे आदेश देण्यात आले आहे.
अशातच जिल्ह्यात अवैधरित्या रेती तस्करांवर महसूल विभाग कारवाई करणार काय ? असा सूरही आता उमटू लागला आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here