विद्यार्थ्यांच्या हाकेला प्रतिसाद : आमदार नरोटे यांनी वाचनालयाच्या छताची केली तात्काळ दुरुस्ती

17

– स्वखर्चातून केलेल्या या विधायक उपक्रमाचे गावकऱ्यांतून कौतुक
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २० : चातगाव येथील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा एकमेव आधार असलेल्या वाचनालयाच्या छतामधून पावसाचे पाणी गळू लागल्याने अभ्यासात मोठा अडथळा निर्माण झाला होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट आमदार मिलिंद नरोटे यांच्याकडे धाव घेतली.
१६ जून रोजी आमदार नरोटे यांनी स्वतः वाचनालयाला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. विद्यार्थ्यांची अडचण गांभीर्याने घेत त्यांनी कोणताही औपचारिक निधी न घेता, स्वखर्चातून दुसऱ्याच दिवशी नवीन टिन पत्रे लावून छताची दुरुस्ती करून दिली.
या तातडीच्या आणि मनापासून केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना आता सुरक्षित, शांत आणि पावसाच्या त्रासापासून मुक्त वातावरणात अभ्यास करता येणार आहे.
ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले असून, त्यांच्या या सामाजिक जाणिवेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. निधीची वाट न पाहता कृतीतून मदत करणाऱ्या आमदार नरोटेंचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय असते, हे दाखवणारा ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here