The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २५ : धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २४ एप्रिल २०२५ रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तालुक्यातील ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यात एकूण ६१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ३१ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित ३० ग्रामपंचायती अनुसूचित जमातीतील सर्वसाधारण गटासाठी राखीव आहेत. या आरक्षणानुसार जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींवर महिला नेतृत्वाची संधी निर्माण झाली असून, तालुक्यात “महिला राज” घडणार हे स्पष्ट झाले आहे.
अनुसूचित जमाती महिला राखीव ग्रामपंचायतींमध्ये पेंढरी, मोहगाव, दुर्गापूर, झाडापापडा, पयडी, कामनगड, मुरगाव, गट्टा, पुसटोला, कोंदावाही, गोडलवाही, कारवाफा, रेखाटोला, चातगाव, साखेरा, मेढांटोला, खुटगाव, जांभळी, गिरोला, रांगी, मिजगाव (बुज), चवेला, लेखा, येरकड, निमगाव, चिंचोली, मोहलि, चुडियाल, मुज्यालगोंदी, मुरूमगाव आणि देवसुर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव गटात सावंगा (बुज), कामतळा, मुंगनेर, मीचगाव झाडा, जप्पी, चिचोडा, नवरगाव, दूधमाळा, फुलबोळी, कुत्थेगाव, निमनवाडा, कन्हाळगाव, चिंगली, तुकूम, हेटी, सोडे, सालेभट्टी, मुस्का, सुरसुंडी, जांगदा (बुजु), पन्नेमारा, ईरुपटोला, खांबाळा, देवसरा खामतळा, दराची, कटेझरी नं. २, कुलभट्टी, सावरगाव आणि हीरंगे या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
ही आरक्षण प्रक्रिया ५/३/२०२५ ते ४/३/२०३० या कालावधीसाठी लागू राहणार असून, आगामी निवडणुकीत महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देणारी ठरणार आहे. तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी आनंद व्यक्त केला जात असताना, काही ठिकाणी निराशा देखील दिसून आली आहे.
