The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १५ ऑक्टोबर : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे आज १५ आक्टोंबर २०२३ ला भारताचे ११ वे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती निमित्य वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे जेष्ठ शिक्षिका माधुरी लांजेवार, शिक्षक उद्धव वाघाडे, प्रकाश मुंगनकर, संघमित्रा कांबळे, विजय मेश्राम हे उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सारखे बनण्याचा प्रयत्न करावे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून सदर वाचन प्रेरणा दिनानिमित्य विविध ग्रंथ तथा पुस्तकांचा स्टाँल लावण्यातआले व विद्यार्थ्यांनी आपली आवडीचे पुस्तके नेऊन ०२ तास वाचन केले.
कु.सायली गाडेगोने, विश्वास अंबादे, कृष्ण येलतुरे, कु.सानिका खुणे, कु.ख़ुशी मेश्राम, हर्शल मेश्राम, प्रांजली आंबोरकर, कु.रेश्मा हिडामी, कु.कशिश वालदे, कु.ख़ुशी कापगते, कु.वैष्णवी वालदे, कु.शनैरा काटेंगे, कु.वेदिका राखडे या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावरती कथन केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन वर्ग १० वी तील विद्यार्थींनी कु.उर्वशी सहारे तर आभार कु.मयुरी सहारे हिने मानले.
कार्यक्रमाला विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक – शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यालातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
