धानोरा येथे राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी

139

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २७ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये २६ जून २०२५ रोजी सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांनी समाजातील शोषित, वंचित, आणि दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य आजही समाजहिताचे दीपस्तंभ ठरत आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक पी. व्ही. साळवे होते. प्रमुख अतिथी म्हणून एन. बी. मेश्राम, पी. बी. तोटावार, कु. आर. जी. मडावी, मोहन देवकते, ओम देशमुख आणि कीर्ती शिंगरूपवार यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित भाषण सादर करून त्यांच्या विचारांचा प्रसार केला. तोटावार सर आणि देवकते सर यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक योगदानावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस. एम. रत्नागिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सामाजिक समतेचे सशक्त प्रतीक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता आणि न्यायाचे बीज पेरण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews #SocialJusticeDay #RajarshiShahuMaharaj #Dhanora #EducationalEvent #StudentEmpowerment #EqualityForAll #ZPHSchool #Gadchiroli #Inspiration #SocialAwareness #LegacyOfJustice
#सामाजिकन्यायदिन #राजर्षीशाहूमहाराज #धानोरा #शिक्षणविभाग #विद्यार्थीउत्कर्ष #समानता #सामाजिकजागरूकता #ZPHSchool #गडचिरोली #मराठीबातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here