डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

33

– सामाजिक न्याय विभागाशी संबंधित तक्रारींचे करणार निराकरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांच्या कार्यालयात दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.०० ते ४.०० वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे जिल्हा स्तरावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक न्याय विभागाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे हा आहे. ज्या नागरिकांना समाज कल्याण विभागाशी संबंधित काही समस्या, अडचणी किंवा तक्रारी आहेत, त्यांनी कार्यक्रमादरम्यान दिलेल्या लिंकद्वारे (https://meet.google.com/xoh-ixfd-eqh) सहभागी होऊन आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहायक आयुक्त सचिन मडावी यांनी केले आहे.
यावेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर त्वरीत कारवाई करण्यात येईल, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here