निराधार महिलांसाठी ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ द्या : शेकापची १४ मे रोजी ठिय्या आंदोलन

51

The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : निराधार महिलांना ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ द्यावा, शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान त्वरित वितरित करावे, आणि अतिक्रमित नागरिकांना घराचे पट्टे द्यावेत या प्रमुख मागण्यांसह शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवार, १४ मे रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन आणि निदर्शने होणार आहेत.
तालुक्यातील श्रावणबाळ निराधार, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार व विधवा परितक्त्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य गेली काही महिण्यापासून वेळेवर देण्यात आलेले नाही. हजारो लाभार्थी पात्र असूनही या योजनांचा लाभही मिळाला नाही. रोजगार हमी योजनेची मजूरी सुध्दा वेळेवर देण्यात आलेली नाही. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे निराधार, विधवा, घटस्फोटीत लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान वेळेवर मिळावे व पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा नव्याने लाभ देण्यात यावा. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान‌स सन्मान योजनेचे अनुदान तातडीने देण्यात यावे, धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, सर्व निराधार योजना लाभार्थ्यांना मासिक ५ हजार पेंशन देण्यात यावी, गडचिरोली शहरातील संघर्षनगर, इंदिरानगर, शाहूनगर, गोकूळनगर, विवेकानंदनगर, विसापूर भागातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांना घराचे कायमस्वरूपी पट्टे देवून नगरपरिषद तर्फे घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, या आणि अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, जिल्हा समिती सदस्य डाॅ. गुरूदास सेमस्कर, भटके – विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबणवाडे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, महिला जिल्हाध्यक्ष कविता ठाकरे, पोर्णिमा खेवले यांच्या नेतृत्वात सदर एक दिवसीय ठिय्या आंदोलन व निदर्शने होणार असून या आंदोलनाला गडचिरोली तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, वयोवृध्द निराधार, संजय गांधी, श्रावणबाळ निराधार व विधवा घटस्फोटीत लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेकाप तालुका समितीचे पदाधिकारी चंद्रकांत भोयर, तुळशिदास भैसारे, अविनाश कोहळे, योगाजी चापले, अभिलाषा मंडोगडे, देवेंद्र भोयर, रमेश ठाकरे, विलास अडेंगवार, रविंद्र बोदलकर, वसंत चौधरी, उमाजी मुनघाटे, विनोद गेडाम, देवानंद साखरे, रामदास दाणे, अमोल शेरकी, उष्ट्र मेश्राम, देविदास मडावी, हरिदास सिडाम, डंबाजी साखरे, हिराचंद कोटगले, मोरेश्वर बांबोळे, विश्वनाथ म्हशाखेत्री, यशवंत मुरकुटे, बाळकृष्ण मेश्राम, दिलीप चौधरी, ईश्वर मंगर, खुमदेव गायकवाड, सुखदेव मानकर, विलास भोयर, कैलास शिंपी, रेवनाथ मेश्राम, किसन साखरे, महागू पिपरे, विजय भोयर, यमाजी गेडाम, राहूल गेडाम, मुर्लीधर गोटा, पुरणशहा मडावी, कालीदास शेरकी, बालाजी भोयर, राजकुमार प्रधान, छाया भोयर, रजनी खैरे, संगीता चांदेकर, रोहिणी उईके, पौर्णिमा कांबळे, अप्सरा डोईजड, हेमलता मुनघाटे, हेमा रायपूरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here