रांगी येथे आरोग्य वर्धीनी उपकेंद्र उपलब्ध करून द्या

209

– गावकऱ्यांनी केली मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १२ ऑक्टोबर : तालुक्यातील रांगी येथे आरोग्य वर्धीनीचे उपकेंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी रांगी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
धानोरा तालुका मुख्यालय पासुन रांगी गाव १८ किमी अंतरावर असुन येथील लोकसंख्या २२०६ आहे. यासोबतच परीसरातील कन्हाळगाव येथील लोकसंख्या ४३०, खेडी या गावाची लोकसंख्या २२४ तसेच धुसानटोला ची लोकसंख्या १५१ असुन एकुण लोकसंख्या ३०११ आहे. या चार गावातील नागरिकांकरिता आरोग्य वर्धीनी उपकेंद्र उपलब्ध नाही. सदर चार गावातील आरोग्य विषयक कामे ही उपकेंद्र चिंगली अंतर्गत चालते. परंतु सदर गावासाठी घरोघरी गृहभेटीद्वारे सहा राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नाही. तसेच असांसर्गिक आजार, किटकशास्त्रीय आजार, साथरोग, जलजन्य आजार, क्षयरोग व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कामे व सर्व्हेक्षण ANM, MPW, CHO या मार्फत व्हावयास पाहीजे परंतु येथे आरोग्य वर्धीनी उपकेंद्र नसल्यामुळे सदर आरोग्य विषयक कामे हे आरोग्य यंत्रणेद्वारे सुलभ करण्यासाठी व जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी याठीकाणी आरोग्य वर्धीनी उपकेंद्राची निर्मीती करून आरोग्य सेवा ही लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आरोग्य वर्धीनी उपकेंद्राची निर्मीती करण्याची मागणी सरपंचा श्रीमती फालेश्वरी प्रदीप गेडाम, ग्रा. पं. सदस्या श्रीमती विद्या कापाट, श्रीमती मंदाबाई वालदे, नितीन कावळे, शशिकला मडावी, देवराव कुनघाडकर,बदिपक कुकडकर, नामदेव बैस, अरुण चापले, श्रीमती वच्छला मडावी, श्रीमती लिला कन्नोक, प्रदीप गेडाम, तुळशीराम भुरसे, श्रीमती अर्चना मेश्राम, नरेद्र भुरसे, दिवाकर भोयर, दिलिप कांटेंगे, इत्यादीनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here