मालेवाडा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा

224

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २५ : तालुक्यात मालेवाडा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर २३ मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजता हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर आणि घरगुती वीज ग्राहकांनी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व सरसेनापती आविस व माजी जि.प.सदस्य नंदू नरोटे आणि माजी पं.स.सदस्य तसेच उपसरपंच तुलशिदास बोगा यांनी केले.
वीज वितरण कंपनीकडून दिवसा अघोषित लोडशेडिंग केल्याने रब्बी हंगामातील धान, मका, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोर्चेकऱ्यांनी अघोषित लोडशेडिंग तात्काळ बंद करावे, शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा द्यावा, घरगुती वीज दर कमी करावेत, डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी द्यावी आणि आदिवासींना मोफत वीज फिटिंग द्यावी, अशा प्रमुख मागण्या मांडल्या.
या मोर्चात मालेवाडा परिसरातील चर्विदंड, यडसकुही, दामेश्वर, धनेगाव, कातलवाडा, रानवाही, खोब्रामेंढा, नवेझरी, मेंढा, खांबाडा, इरुपटोला, सावतला, सुरसुडी मुस्का, पळसगाव, मंगेवाडा या गावांतील नागरिक, महिला, शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.

#मालेवाडा_मोर्चा #वीजसमस्या #शेतकरी_आंदोलन #अघोषित_लोडशेडिंग #वीजपुरवठा #गडचिरोली #शेतकरी_हक्क #आंदोलन #महाराष्ट्र_बातम्या
#MalevadaProtest #ElectricityCrisis #FarmersProtest #UnscheduledLoadShedding #PowerSupply #Gadchiroli #FarmersRights #MaharashtraNews #RuralIssues

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here