गडचिरोलीच्या शूरवीरांना राष्ट्रपतींकडून ‘पोलीस शौर्य पदक’ : ७ जवानांच्या धैर्याचा गौरव

714

– हेमलकसा-कारमपल्ली रस्त्यावरील चकमकीतील पराक्रमाचा मानाचा सन्मान
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जात असते. यावर्षी सुद्धा आज 14 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला महामहीम राष्ट्रपती यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकुण 07 अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक जाहिर झाले असून, हे सर्व अधिकारी व अंमलदार गडचिरोली पोलीस दलातील आहेत. गडचिरोली पोलीस दलास 2025 मध्ये एकूण 07 पोलीस पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले असून मागील पाच वर्षात एकूण 03 शौर्य चक्र, 210 पोलीस शौर्य पदक व 08 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत. गडचिरोलीच्या मातीतले शूरवीर पुन्हा एकदा संपूर्ण देशाच्या अभिमानाचे कारण ठरले आहेत.
2017 मधील हेमलकसा-कारमपल्ली रस्त्यावरील भीषण चकमकीत या जवानांनी दाखवलेले अद्वितीय धैर्य आजही लोकांच्या स्मरणात आहे. सी-60 पथक भामरागडला परत जात असताना माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून भ्याड हल्ला केला. स्फोटानंतर झालेल्या प्रखर गोळीबारात जवानांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून जखमी सहकाऱ्यांना वाचवले आणि प्रत्युत्तरात्मक कारवाई करत माओवाद्यांना मागे हटवले.
या शौर्यपूर्ण कामगिरीचा सन्मान म्हणून यंदा ज्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ बहाल झाले त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर, सफौ मनोहर कोतला महाका, चापोहवा मनोहर लचमा पेंदाम, पोशि प्रकाश ईश्वर कन्नाके, पोशि अतुल सत्यनारायण येगोलपवार, पोशि हिदायत सदुल्ला खान, शहीद पोशि सुरेश लिंगाजी तेलामी (मरणोत्तर) यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या वीर जवानांचे मनापासून कौतुक करत म्हटले, “गडचिरोलीचे पोलीस नेहमीच देशाच्या सुरक्षेसाठी सर्वस्व पणाला लावतात. हा सन्मान त्यांच्या धैर्य, निष्ठा आणि बलिदानाची खरी पावती आहे.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #पोलीसशौर्यपदक #हेमलकसाचकमक #गडचिरोलीपोलीस #C60 #शौर्यगाथा #राष्ट्रपतीसन्मान #माओवादविरोधीकारवाई #शूरवीर #गडचिरोलीअभिमान #Gadchiroli #PoliceBraveryMedal #HemalkasaEncounter #GadchiroliPolice #C60 #BraveryStory #PresidentialHonour #AntiMaoistOperation #Bravehearts #PrideOfGadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here