फार्मर कप २०२६च्या तयारीला वेग ; कोरची तालुक्यातील शेतकरी निवासी प्रशिक्षणासाठी रवाना

60

फार्मर कप २०२६च्या तयारीला वेग ; कोरची तालुक्यातील शेतकरी निवासी प्रशिक्षणासाठी रवाना
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेत प्रभावी सहभाग नोंदवण्यासाठी कोरची तालुक्यातील शेतकरी सज्ज झाले असून, त्यांच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ९ ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी येथील द नेचर प्राईड रिसॉर्ट येथे होणाऱ्या या प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, शाश्वत व स्पर्धात्मक शेती पद्धतींचा अवलंब, संसाधनांचे योग्य नियोजन तसेच सामूहिक सहभागातून विकास साधण्यावर या प्रशिक्षणात भर देण्यात येत आहे. बदलत्या कृषी आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवासह तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे.
कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि ‘उमेद’ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढत असून ‘फार्मर कप २०२६’साठी कोरची तालुका सक्षमपणे पुढे येत आहे.
प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना रवाना करताना प्रभारी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर मसराम, गु.नि. अधिकारी आय. जे. पाथोरे, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी तसेच पाणी फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर इमरान खान पठाण उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण पाहायला मिळाले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here