The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २० : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मुरूमगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन ठेंग यांची राज्यस्तरीय ‘विशेष सेवा पदक’ या प्रतिष्ठित सन्मानासाठी निवड झाली आहे. पोलिस महासंचालक कार्यालय तर्फे जाहीर करण्यात आलेल्या या सन्मानामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठेंग यांनी प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळताना मुरूमगाव परिसरात प्रभावी एरिया डॉमिनेशन व नक्षलविरोधी मोहिमा राबवून माओवादी कारवायांना आळा घालण्यात यश मिळवले. त्याचबरोबर कॅम्युनिटी पॉलिशिंग व ग्रामभेटीच्या उपक्रमांद्वारे आदिवासी बांधवांमध्ये शासनाविषयी विश्वास निर्माण करून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणला.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलिस महासंचालक कार्यालयाने त्यांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर केले. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान जाहीर करण्यात आला.
त्यांच्या या यशाबद्दल सीआरपीएफ ११३ बटालियनचे असिस्टंट कमांडंट शशिभूषण यादव, पिएसआय राहुल चौधरी, सरपंच शिवप्रसादजी गवर्णा, पोलिस पाटील चंद्रशेखर ओरमडिया, डॉ. राहुल बनसोड, मिटू दत्त, मुख्याध्यापिका डी.वाय. मेश्राम, शरीफभाई कुरेशी, ओम देशमुख, मुख्याध्यापक चंदू रामटेके, बाळकृष्ण बोरकर आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #धानोरा #मुरूमगाव #पोलिस #सचिनठेंग #विशेषसेवापदक #नक्षलविरोधीमोहिम #CommunityPolicing #MaharashtraPolice #SwatantryaDin
