पोलीस- नक्षल चकमक : तिन जवान शहीद

2568
File Photo

– काही नक्षलीही जखमी असल्याची शक्यता
The गडविश्व
सुकमा, २५ फेब्रुवारी : छत्तीसगडच्या सुकमा जिल्हयात पोलीस नक्षल चकमक उडाली यात डिआरजीचे तिन जवान शहीद झाल्याची माहिती आहे. सदर घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. एएसआय रामुराम नाग, असिस्टंट कॉन्स्टेबल कुंजम जोगा आणि शिपाई वंजाम भीमा असे शहीद जवानांची नावे आहेत.
शनिवार २५ फेब्रवारी रोजी सकाळच्या सुमारास सुकाम जिल्हयातील जगरगुंडा पेालीस ठाण्यातून डीआरजी पथक नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान जगरगुंडा आणि कुंदेड दरम्यान सकाळी ९ वाजताच्या सुमारास पोलीस दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असल्याचे कळते. तर चकमकीत अनेक नक्षलीही जखमी व ठार झाल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. घटनास्थळ परिसरात पोलीस दलमार्फत तीव्र शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

 

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (Vinay Gowda) (National Commission for Scheduled Tribes) (Maharashtra DGP Rajnish Seth) (Municipal Corporation of Delhi) (Women’s World Cup) (Sergio Ramos) (The Gdv) (Police-Naxal encounter: Three jawans martyred) (chhattisgarh news) (cg News) (Sukma) (Jagagunda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here